dr.satish best web design developer for mac

यमेहट्टी ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यापासून 32 किलोमीटर अंतरावर वसलेलं यमेहट्टी हे आमच गाव. गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 25 सप्टेंबर 1989 रोजी झाली. गाव तसं लहान आहे पण आखीव व टुमदार हिरव्याकंच वनश्रीने नटलेलं आहे. येथील निसर्ग प्रत्येक ऋतूत विविध रंगांची उधळण अगदी मुक्तहस्ते करीत असताना भासत मग...ती शिशिराची पानगळ असो, जर्द पिवळे हेमंताचे सुवर्णवैभव असो, वसंताचा शृंगार साज असो किंवा श्रावणातील ऊन-सावलीचा खेळ! प्रत्येक ऋतूचे लावण्य न्याहाळताना निसर्ग एक मोठा किमयागार वाटतो. गावाच्या शेजारी काळामवाडी, कुमरी, सोनारवाडी, अडकूर ही गावे वसलेली आहेत. गावामध्ये प्राचीन तीन मंदिरे आहेत. चाळोबा मंदिर, हनुमान मंदिर, पांढर मंदिर ही गावामध्ये मंदिरे असून श्री पांढरी हे गावाचे ग्रामदैवत आहे. गावात सिंचनाची सुविधा बोअरवेल व्दारे केली जाते त्यामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 25 सप्टेंबर 1989 साली झाली आहे. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.

सरपंच
सौ. चांगुणा अंकुश गावडा

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. बाबु तुकाराम गावडा

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. योगेश एकनाथ बामणे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Yamehatti Grampanchayat
A- Yamehatti P- Sambare Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :

Office :